'राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार मजबूत'| Sharad Pawar|Baramati |NCP| Shivsena|Congress|Sakal Media

2021-06-27 4,890

राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार मजबूत- शरद पवार
बारामती - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे मजबूतपणे टिकेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला . बारामतीत आज गोविंदबाग येथे पत्रकारांशी ते संवाद साधत होते. सरकारची स्थापना झाली त्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यावतीने बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अजित पवार व जयंत पाटील यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होईल त्यावेळेस हे सहा नेते एकत्र बसून चर्चा करून त्यातून मार्ग काढतात, त्यामुळे हे सरकार मजबूत आणि स्थिर आहे, सरकारला कसलाही धोका नाही असा स्पष्ट निर्वाळा शरद पवार यांनी दिला.